मसुरे गडघेरा दत्त मंदिर नजीक ट्रांसफार्मर जागा बदल काम पूर्ण..

उद्योजक दत्ता सामंत आणि माजी खासदार निलेश राणे यांची आश्वासन पूर्तता..

मसुरे ,दि.२५ जानेवारी
मसुरे गडघेरा वाडी दत्त मंदिर नजीक असलेल्या ट्रान्सफॉर्मर बदल करण्याच्या जागेची येथील ग्रामस्थांची गेली दहा वर्षातील मागणी अखेर उद्योजक दत्ता सामंत आणि माजी खासदार निलेश राणे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे तीन लाख रुपयाचा निधी स्वखर्चातून दत्ता सामंत आणि निलेश राणे यांनी देऊन ग्रामस्थांचे गेल्या कित्येक वर्षाची मागणी पूर्ण केली. नवीन जागेत बसविण्यात आलेल्या ट्रांसफार्मर चा शुभारंभ उद्योजक डॉक्टर दीपक परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्योजक भाजप नेते दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी उद्योजक दत्ता सामंत यांचा दत्तप्रासादीक गडघेरा मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने प्रमोद शिंगरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करण्यात आला..
यावेळी मसुरे गावचे सुपुत्र उद्योजक डॉक्टर दीपक परब यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या ट्रान्सफर बसविण्यासाठी मोफत जागा देणारे स्थानिक ग्रामस्थ सुरेश शिंगरे, प्रमोद शिंगरे या कुटुंबाचा सुद्धा मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी डॉक्टर दीपक परब, महेश बागवे, सरोज परब मालवण माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉक्टर दीपक परब म्हणालेत दत्ता सामंत यांचे दातृत्व खूप मोठे आहे. माजी खासदार निलेश राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून विकासात्मक कामे या भागामध्ये होत असून जनतेने सुद्धा विधायक कामे करणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. यावेळी सत्कारास उत्तर देताना दत्ता सामंत म्हणालेत मी करत असलेले कार्य हे परमेश्वराच्या मनात असते आणि म्हणूनच अशी विधायक कामे माझ्या आणि माजी खासदार निलेश राणे भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी यांच्या माध्यमातून नेहमी होत असतात. गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला येथील ट्रांसफार्मर जागा बदलाचा प्रश्न येथील आमदाराला आणि शिवसेनेच्या स्थानिक नेतेमंडळींना सोडविता आला नाही. ग्रामस्थांचा प्रलंबित प्रश्न आज आम्ही शब्द दिल्याप्रमाणे पूर्ण केला यामध्ये आम्हाला समाधान आहे. यापुढेही या भागातील विधायक कामांच्या मागे आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, उद्योजक डॉक्टर दीपक परब, उद्योजक जयेश परब, माजी जि प अध्यक्ष सरोज परब, उद्योजिका सौ परब, वेरळ सरपंच धनंजय परब,माजी उपसभापती छोटू ठाकूर, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, सुरेश शिंगरे, विलास मेस्त्री, मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण शिंगरे, ग्रामपंचायत सदस्य जग्गू चव्हाण, सचिन पाटकर, शिवाजी परब,अशोक बागवे, प्रमोद बागवे, जितेंद्र परब, किरण पाटील, तात्या हिंदळेकर, विशू तोंडवळकर, हिरबा तोंडवळकर, दीपक सावंत, पुरुषोत्तम शिंगरे, विरेश तोंडवळकर, प्रमोद शिंगरे, मुकेश मुळये, विठल तोंडवळकर, संकेत परब, शैलेश तोंडवळकर, संतोष बांदिवडेकर, ओमकार मेस्त्री, प्रमोद बागवे, विशू तोंडवळकर आणि गडघेरावाडी ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले.