सावंतवाडी दि.२५ जानेवारी
सावंतवाडी- सावंतवाडी तालुक्यातील माजगाव म्हालटकरवाड्यातील धालोत्सव मंगळवारी सुरु करण्यात आला. वाड्यातील सर्व पुरुष, महिलांनी मांडावरील जागा साफ करुन इतरही परिसर साफ केला. पहिल्या दिवशी वाड्यातील सर्व महिला, पुरुष, बालगोपाळ सर्वे मंडळी महादेव उत्सव मुर्तीकडे एकत्र येवून रितीरिवाजाप्रमाणे मानपान करुन, समई, पलडी तसेच सर्व साहित्य घेवून सर्व मंडळी मांडावर जावून पाटावर पलडी ठेवून, रांगोळी घालतात, महिला फाट्या धरुन ओव्या व गिते गातात.
सात दिवस चालणा-या धालोत्सवाची शेवटची रात्र सोमवार दि. २९ जानेवारी रोजी असून मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत मांड शिंपणे, ओट्या भरणे, नवस बोलणे व फेडणे आदी कार्यक्रम संपन्न होतात. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे म्हालटकरवाडा वासियातर्फे आवाहन करण्यात आले आहे.