सावंतवाडी राजघराणे दशावतार कलेला देत असलेले प्रोत्साहन निश्चितच कौतुकास्पद

डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू,मुंबई विद्यापीठ.

सावंतवाडी दि.२५ जानेवारी
दशावतारी कलेला सावंतवाडी राजघराणे प्रोत्साहन देत आहे. हे निश्चित कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या विद्यमाने राजवाडा सावंतवाडी येथे दशावतार महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत भोंसले ,कार्याध्यक्षा सौ.शुभदादेवी भोंसले यांच्या शुभहस्तेे करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी ,
प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे , विविध विभागांचे अधिष्ठाता डॉ. अनिल सिंग, डॉ. सुनील पाटील ,डॉ. माधव राजवाडे, डॉ.किशोरी भगत, डॉ. वेलिंग, जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली,व वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचे मालक श्री नाथा नालंग ,सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियमक मंडळाचे सदस्य श्री.जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल,प्रा.दिलीप गोडकर, महाविद्यालयाचा प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच दशावतार नाट्यरसीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वास्तविक प्रा. दिलीप गोडकर यांनी केले.त्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, युवराज लखमसावंत भोंसले यांनी सर्व उपस्थित मान्यवरांना धन्यवाद दिले तसेच गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दशावतार नाट्य महोत्सवाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्या रसिकांचे त्यांनी आभार मानले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी यांनी दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक कला आहे ही जोपासण्याचं काम राजघराण्याच्या वतीने केले जात आहे.राजघराणे अशा कलांना प्रोत्साहन देत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.मुंबई विद्यापीठाच्या वतीने सुद्धा कोकणातील विविध कला यांचा अभ्यास करण्यासाठी कलादालन उभे करण्यात आले आहे.श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल.भारमल यांनी सांगितले की महाविद्यालयाच्या वतीने सुद्धा एक लोककला केंद्र याच वर्षी सुरु करण्यात आले आहे. यामध्ये येथील लोककलांचा अभ्यास केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी उपस्थित राहिले ,प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे तसेच विविध विभागांचे अधिष्ठाता उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी त्यांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर या भागातील विविध कला जोपासण्यासाठी राजघराणे नेहमीच तत्पर राहील अशी ग्वाही दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी जी बोर्ड यांनी केले तर आभार डॉ. एस एम बुवा यांनी मानले.