आ. नितेश राणे यांनीही कणकवली येथील आयोजित संमेलनात केले मार्गदर्शन;नव मतदार मोठ्या संख्येने उपस्थित
कणकवली दि .२५ जानेवारी (भगवान लोके)
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील प्रहार भवनच्या हॉलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून “नमो नव मतदार संमेलन” आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे यांनी उपस्थित नव मतदारांना मार्गदर्शन केले.
यावेळी विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष आण्णा कोदे, पप्पू पुजारे, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, बाबू राणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. नितेश राणे म्हणाले, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन मतदारांशी संवाद साधणार आहेत. भारतात आपण राहतो. तिथे शिकत असताना, नोकरी करत असताना आपल्या आजूबाजूला आपला देश कसा घडतो पहा. आंतरराज्य पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा काय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अन्य देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान काय बोलतात याबाबतीत सखोल माहिती गुगलवर तसेच सोशल मीडियावर पाहिलीच असेल.
तसेच यावर्षी आपण सर्वजण पहिल्या वेळी मतदान करणार आहात. आपण आपल्या मताने देशात कोणाचं सरकार आणायचे हे ठरवणार आहात. तसेच देशाचा नेतृत्व कोण करणार हे ठरवण्यासाठी लोकशाही पद्धतीने सर्वांना ताकद दिलेली आहे. ही ताकद आपल्या हातात आहे. मात्र ही ताकद योग्य पद्धतीने वापरायची कशी यासाठी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. आज आपला देश कुठल्या पातळीवर आहे आणि देशातील नागरिकांना आपल्याला काय अपेक्षा आहे, हे लक्षात ठेवून मतदानाकडे पाहिले पाहिजे.
गेले दहा वर्षे म्हणजे २०१४ ते २०२४ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश अतिशय यशस्वी पद्धतीने महाराष्ट्र मध्ये सुपर पॉवरच्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्या चायना सोबत आपली स्पर्धा आहे. त्या तुलनेत आपला देश फार मोठ्या प्रमाणात पुढे जात आहे. आपला भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. चायना मध्ये तरुणांची लोकसंख्या कमी होत चालली आहे. नवीन मतदारांनी देशात झालेले हे विविध बदल बारकाईने मागितले पाहिजे. स्वतः मतदान करत असताना २०१४ आधी देश कसा होता. काँग्रेस काळात भ्रष्टाचार किती चालायचा..? काँग्रेस नंतर दहा वर्षात आपल्या देशाकडे पाकिस्तान, बांगलादेश यांच्यासारख्या लोकांची आपल्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याची हिंमत कोणाची होत नाही. त्यामुळे नवीन मतदाराने आपल्या हातात असलेला निर्णय लोकसभा निवडणुकीत वापरावे.