सावंतवाडी,दि.२५ जानेवारी
दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या तीन संशयिताना अटक करून बुधवारी रात्री न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस दि.२७ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी मंजूर झाली तर उर्वरित दोन अल्पवयिन युवकांना गुरुवारी बालन्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी सुधारगृहात करण्याचे आदेश झाले
समाजांमंध्ये धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी दोन दिवसात पाच जणावर गुन्हा दाखल केला होता. यात दोन अल्पवयीन युवकांचा देखील समावेश आहे.ताब्यात घेतलेल्या तिघांना बुघवारी रात्री उशिरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ३ दिवसाच्यां पोलीस कोठडीत ठेवण्याचे देण्यात आले. तर उर्वरित दोघा अल्पवयीन युवकांना गुरुवारी बालन्यायालयात हजर करण्यात आले.यां गुन्ह्यातील पाच ही संशयित यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान यां गुन्ह्याचा सखोल तपास पोलिस करीत असून यात समावेश असणाऱ्या अन्य संशयित यांचा शोध पोलिस घेत आहेत टप्प्या टप्प्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती तपासी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी दिली.