सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळातर्फे “स्नेहमेळावा व वधूवर पालक परिचय मेळाव्याचे”आयोजन २८ जानेवारी रोजी

जिल्ह्यातील तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

तळेरे,दि.२५ जानेवारी

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळातर्फे स्नेहमेळावा व वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार २८ जानेवारीला सकाळी ९ ते सायंकाळी ४ यावेळेत कलमठ येथील जानवली पुलानजीकच्या वृंदावन हॉल येथे करण्यात आले आहे.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण तेली असून कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर स्वागताध्यक्ष असणार आहेत. उद्घाटन काजू उद्योजक सुरेश नेरूरकर यांच्या हस्ते होणार असून यावेळी आंतरराष्ट्रीय चित्रकार किशार नादावडेकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे महासचिव भुषण कर्डिले, सहसचिव जयेश बागडे, महिला अध्यक्ष रोहिणी महाडिक, कोकण विभाग अध्यक्ष सतीश वैरागी, जिल्हाध्यक्ष एकनाथ तेली, रत्नागिरी तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, गोमंतक हिंदू तेली समाज गोवा संघटनेचे अध्यक्ष अनिल कोंडूरकर, हिंदू तेली समाज गोव्याचे अध्यक्ष स्मितेश तळवडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रविवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ८ वा. नावनोंदणी, १० वा. पासून स्वागत, उद्घाटन, स्नेहमेळावा, प्रास्ताविक, सत्कार, मान्यवरांचे मनोगत, दु. १ वा. स्नेहभोजन, दु. २ ते सायं. ५ यावेळेत वधु – वर पालक परिचय मेळावा होणार आहे.

तरी सदरच्या तेली समाज मेळाव्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तेली समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष तुकाराम तेली, नीलेश कामतेकर, सचिव परशुराम झगडे, खजिनदार चंद्रकांत तेली यांनी केले आहे.