आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी महिलेवर कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल

अटक करुन नायायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी ; देवगड तालुक्यातील कासार्डे येथे करते महिला मच्छी विक्रीचा व्यवसाय

कणकवली दि.२५ जानेवारी(भगवान लोके)

देवगड येथील रहिवासी असलेल्या एका ४४ वर्षीय मुस्लिम समाजातील महिलेने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी तिच्यावर कणकवली पोलिसात भादवी २९५ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही महिला मूळ देवगड तालुक्यातील असली तरी ती कासार्डे तिठा या ठिकाणी मच्छी विक्रीचा व्यवसाय करते. तिने ठेवलेला स्टेटस हा आक्षेपार्ह असल्याची बाब निदर्शनास येताच कासार्डे येथील वातावरण काल तणावपूर्ण बनले होते. त्यानंतर कणकवली पोलिसांनी काल रात्री कासार्डे येथे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान देवगड तालुक्यातील त्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. तिला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी फिर्याद दिली. कणकवली तालुक्यात गेले दोन दिवसात या लागोपाठ अशा प्रकारच्या घटना घडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दरम्यान या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत दंगल नियंत्रक कार्यरत ठेवण्यात आले असून, पोलीस उपाधीक्षक ऋषिकेश रावले यांनी कणकवली पोलीस स्टेशनला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

Google search engine