गाईड कब, बुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळावा

सिंधुदुर्गनगरी,दि.२५ जानेवारी

भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा जिल्हास्तरीय कब-बुलबुल, स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दि. 1 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बॅ.नाथ पै सेंट्रल हायस्कूल (MIDC) ता. कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

स्काऊट गाईड चळवळ हस्तव्यवसाय, आरोग्य, सेवा, चारित्र्य या चार मुलभूत आधार स्तरावर आधारित आहे. या गुणांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास करण्यासाठी शाळास्तरावर स्काऊट, गाईड कब, बुलबुल पथके स्थापन करण्यात आली आहेत. शाळास्तरावर या पथकांना प्रशिक्षित शिक्षकामार्फत नियमित मार्गदर्शन करुन विद्याथ्यांमध्ये सुसंस्कार, मुल्य रुजविण्याचे काम केले जाते. विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा, यासाठी स्काऊट गाईड चळवळ महत्वाची आहे. दरवर्षी शाळास्तरावरील स्काऊट गाईड पथकांचा जिल्हास्तरीय निवासो मेळावा आयोजीत केला जातो. यावर्षी हा मेळावा दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बॅ.नाथ पे सेंट्रल स्कूल (MIDC) ता. कुडाळ जिल्हा सिधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या मुल्यामधुन सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, स्वावलंबन, शिस्त, धाडस इ. गुण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मेळाव्याच्या तीन दिवशीय कार्यक्रमामधुन विद्याथ्यांमध्ये स्वावलंबन बंधुभाव संघभावना वाढते, तरी सर्व शाळेतील स्काऊट गाईड पथकांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या पथकानी आपल्या प्रशालेतील 10 स्काऊटस् य 10 गाइडस् तसेच स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन यांनी सहभागी व्हावे, याठिकाणी दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी सर्वप्रथम तंबू उभारणी करणे, दुपारी 4 वाजता उद्घाटन कार्यक्रम, रात्री शेकोटी कार्यक्रम तसेच दुसऱ्या दिवशी मातीकाम, तात्पुरता निवारा, गाठीच्या स्पर्धा, गॅझेट, शेकोटी कार्यक्रम, शोभायात्रा अशा विविध प्रकारच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभाग नोंदविणे करीता आपल्या शाळेतील कब, बुलबुल, स्काऊट आणि गाईड सहभागी होणार आहेत नावाची यादी E-mail: sindhubsg@gmail.com वर तसेच 9322223995 या नंबर वरती पाठवावी दिनांक 26 जानेवारी 2024 पुर्वी पाठवावी नियोजन करणे सुलभ होईल.

या जिल्हा मेळावा हा तीन दिवशीय निवासी असल्याने येणाऱ्या सर्व स्काऊटस् गाईडस् करीता मेळाव्याची पूर्व तयारी मेळावा आयोजक करीत आहेत. तरी जास्तीत जास्त शाळेतील पथकांनी तयारीनिशी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व जिल्हा चिटणीस यांनी केले आहे.