२६ जानेवारी कुष्ठरोग जनजागृती अभियान

सिंधुदुर्गनगरी,दि.२५ जानेवारी

दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगविषयकी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवायचे आहेत, महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त दिनांक ३० जानेवारी २०२४ ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत कुष्ठरोगबाचत विविध जणजागृती कार्यक्रम राबवायचे आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावाडे यांनी आठही तालूक्यात गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तालुक्य आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कुष्ठरोगाबाबत जनजागरण स्पर्श मोहिमेबाबत कार्यक्रम घेण्याबाबत आवाहन केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपातळीवर कुष्ठरोगाबाबत समाजात पसरलेल्या गैरसमज अंधश्रध्दा व भीती दूर करण्याकरीता प्रजासत्ताक दिनी प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान घेण्यात आले. या अभियानात कुष्ठरोगाबाबत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे घोषणापत्र, सरपंचाचे भाषण व प्रतिज्ञा याचे वाचन करण्यात आले.

राष्ट्रीय कुष्ठरोग निमूर्लन कार्यक्रम उद्दिष्ट व “स्पर्श ” कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२४ उद्देश,

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत औषधोपचाराखाली आणणे. नवित सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोग विषयी जनजागृती करणे. जिल्ह्यातील कुष्ठरुणांचे प्रमाण शुन्यावर आणणे.जिल्हयातील कुष्ठरोगाच्या संसर्गाचे प्रमाण शुन्यावर आणणे.जिल्हयातील विकृती कुष्ठरुग्णांचे प्रमाण शून्यावर आणणे. कुष्ठरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव नाहीसा करणे.

“Sparsh Leprosy Awareness Campaign 2024″ मोहिमेमध्ये कुष्ठरोगविषयी समाजात जनजागृती करून समाजातील दडून राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ” कलंक कुष्ठरोगाचा मिटवु या, सन्मानाने स्विकार करुया” हे या वर्षीचे घोषवाक्य आहे.

कुष्ठरोगाची संशयित लक्षणे

शरीरावरील कोणताही लालसर / फिक्कट न खालणारा चट्टा. तेलकट, गुळगुळीत, चकाकणारी त्वचा तसेच कानाच्या पाळयांवर व शरीरावर गाठी येणे. हाताच्या बोटांमध्ये वा पायाच्या पंजामध्ये अशक्तपणा वा कमजोरी येणे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व शासकिय रुग्णालयांमध्ये कुष्ठरोगाची तपासणी व उपचार मोफत करण्यात येतात. सदरील उपक्रम राबविणेची जबाबदारी गावपातळीवर ग्राम आरोग्य व स्वच्छता समिती यांचे राहिल व हे उपक्रम आरोग्य सेविका / ग्रामसेवक/ तलाठी/ शिक्षक/ आशाताई / अंगणवाडी सेविका इत्यादी कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात याव्यात, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकिय अधिकारी हे नोडल अधिकारी म्हणून व गावस्तरावर आरोग्य सेवक / सेविका नोडक कर्मचारी म्हणून काम करतील.

कुष्ठरोगाबाबत जनजागरण स्पर्श ” कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२४ (Sparsh Leprosy Awareness Campaign 2024) अभियानाबाबत कार्यक्रम घ्यावयाचे असून त्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपातळीवर शिक्षक, विद्यार्थी यांची प्रभात फेरी काढावी व यामधून समाजात पसरलेल्या कुष्ठरोगाबाबत गैरसमज, अंधश्रध्दा व भीती जेणेकरुन दूर होईल, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर व गावस्तरावर प्रभात फेरी, महिला मेळावे, गटसभा, शालेय मुलांच्या स्पर्धा इ. घेण्यात येणार आहेत.