दिल्लीत प्रजासत्ताक दिनी पंधराशे महिलांचा कार्यक्रम

महाराष्ट्रासह विविध राज्यातील ढोलपथकांचा समावेश : कोरिओग्राफर देवेंद्र शेलार यांच्यासह संजय पेटकर यांचेही मार्गदर्शन

कणकवली दि.२५ जानेवारी(भगवान लोके)
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच १५५० महिला कलाकारांचा कार्यक्रम दिल्लीमध्ये सादर होत आहे. यामध्ये महाराष्ट्र केरळ, कर्नाटक, बेस्ट बंगाल, तेलंगणा आदी राज्यातील ढोल पथकांचा समावेश आहे. तसेच कथ्यक ओडिसी मरतनाट्यम छाबू लावणी भांगडा कोळी यांच्यासह १२० क्रॉप्स आर्टिस्ट यांचा समावेश आहे.
मारत सरकारच्या सांस्कृतिक बिमाग संचलित संगीत नाटक अकादमीच्या
अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेच्या यांच्या मार्गदर्शनाखाली कोरिओग्राफर देवेंद्र शेलार
यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे ५० सह
कोरिओग्राफर काम करत आहेत. या टीममध्ये कणकवलीचे संजय पेटकर यांची
सहकोरिओग्राफर म्हणून निवड झाली आहे. या कार्यक्रमाचे गीत सुमाष सैगल
यांनी लिहिले आहे तर रणजीत बरोत यांनी त्याला संगीतबद्ध केल आहे. तर
हरीश मिमानी हे निवेदक आहेत. गेले काही दिवस कडाक्याच्या थंडीत रंगीत
तालीम सुरू असून २६ जानेवारीसाठी सर्व कलाकार सज्ज झाले आहेत, असे श्री.
पेटकर यांनी सांगितले.
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील कर्तव्यपथ येथे होणाऱ्या आरडी
परेडसाठी प्रथमच देशातील विविध राज्यातील १२० महिला ढोल वादक या परेडची
सुरुवात करणार आहेत. त्यानंतर विविध सुरक्षा दलाच्या महिला पुरुष सैनिकांची
परेड सुरू होणार आहे त्यानंतरच्या नारीशक्ती या थीमवर आधारित वंदे भारत या
कार्यक्रमांमध्ये ४०० शास्त्रीय नृत्य नर्तिका व ८०० लोककला कलाकार १२०
मास्क कलाकार यांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे.