जामसंडे येथील नागरी सुविधा केंद्राचे टाळे कर्मचाऱ्या अभावी उघडले नाही !

सत्ताधारी’विरोधी नगरसेवक याकडे गांभीर्याने पाहणार का ?

 देवगड,दि.२५ जानेवारी (गणेश आचरेकर)

देवगड-जामसंडे नगरपंचायतीमार्फत शहरातील नागरिकांना घरपट्टी,पाणीपट्टी भरण्यासाठी सुरू करण्यात आलेले जामसंडे येथे नागरी सुविधा केंद्राचे टाळे कर्मचाऱ्या अभावी उघडले नसल्यामुळे शहरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून याकडे सत्ताधारी,विरोधी नगरसेवक याकडे गांभीर्याने पाहणार का ? असा सवाल शहरातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना घरपट्टी,पाणीपट्टी भरण्यासाठी जामसंडे येथे नागरी सुविधा केंद्र आठवड्यातून दोन दिवस म्हणजे सोमवार आणि गुरुवार सुरू करण्यात आले.मात्र कर्मचाऱ्यांना अभावी नागरिक सुविधा केंद्र गुरुवारी खुले न झाल्यामुळे घरपट्टी,पाणीपट्टी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.पाणीपट्टी भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी असल्यामुळे पाणीपट्टी भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना नागरी सुविधा केंद्राला टाळे असल्यामुळे माघारी परतावे लागले सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळे नागरी सुविधा केंद्रामध्ये आलेल्या नागरिकांना देवगड येथील नगरपंचायत दालन गाठल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे अथवा दंड भरावा लागणार या भीतीपोटी नागरिकांनी नगरपंचायत गाठत आपले पाणीपट्टी,घरपट्टी बिल भरावे लागले नागरिकांना होणाऱ्या आर्थिक भूदंडाला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित करत सत्ताधारी,विरोधक नगरसेवक याकडे गांभीर्याने पाहतील का?असा सवाल सर्वसामान्य शहरवासीयांमधून उपस्थित केला जात आहे.