तळाशील ग्रामस्थ खाडीपात्रातील उपोषणावर ठाम

आचरा,दि.२५ जानेवारी 

तळाशील तोंडवळी समोरील खाडीपात्रात दिवस रात्र सुरु असणाऱ्या वाळू उत्खननावर कठोर कारवाई करून तात्काळ उत्खनन थांबवावे, तळाशील किनारपट्टीचा भूभाग खचून खाडी पात्रात तयार झालेला सॅन्डबार ड्रेझरच्या साहाय्याने उपसा करून पुन्हा किनारपट्टीवर टाकण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेऊन कालावल खाडीपात्रात 26 जानेवारी पासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिल्यानंतर उपोषण ग्रामस्थांनी मागे घ्यावे अशी विनंती करण्यासाठी प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे व मालवण तहसीलदार वर्षा झालटे या तळाशील येथे दाखल झाल्या होत्या.तळाशील तोंडवळी येथे येऊन उपोषण मागे घेण्यासाठी चर्चा केली मात्र ग्रामस्थ दीड तासाच्या चर्चेनंतर उपोषणावर ठाम राहिल्याने झालेली चर्चा निष्फळ ठरली. ग्रामस्थांनी खाडी पात्रात उतरून उपोषण करणार असल्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान, तळाशील तोंडावळी येथे ग्रामस्थांनी उपोषण करू नये असे आवाहन करण्यासाठी प्रांताधिकारी ऐशवर्या काळुशे, स्वाती देसाई, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहा :बंदर निरीक्षक सुहास गुरव, अरविंद परदेशी, मंडळ अधिकारी अजय परब, आचरा तलाठी संतोष जाधव दाखल झाले होते. यावेळी तळाशील व तोंडवळी येथील ग्रामस्थांनी आक्रमक स्वरूपात भूमिका मांडली.

दरम्यान प्रांतधिकारी यांनी बेकायदेशीर वाळूवर कारवाईसाठी पथक नेमते तसेच अनधिकृत बोटी आढळून आल्यास त्यावरही कारवाई करते असे अश्वस्थ केले, खाडी किनाऱ्यावरील बंधऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ स्थरावर पत्रव्यवहार करते तोपर्यंत आपण पुकारलेले खाडीपत्रातील उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली मात्र ग्रामस्थांनी गेली अडीज वर्षे आम्ही शासन दरबारीं मागण्या घेऊन फिरतो आहोत मात्र आतापर्यंत आश्वासनापुढे काहीच झालेले नाही. त्यामुळे जोपर्यंत अनधिकृत वाळू उपसा बंद होत नाही तोपर्यंत खाडीपत्रातील पुकारलेले उपोषणापासून मागे हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तळाशील ग्रामस्थ खाडीपत्रातील उपोषणासाठी गोपाळकृष्ण मंदिरात जमून उपोषण चालू करण्यासाठी तळशील वरचीवाडी येथे खडीपात्रात उतरणार आहेत. जोपर्यंत ठोस कारवाई नाही तोपर्यंत खाडी पत्रातून बाहेर न पडण्याचा निर्धार तळाशील ग्रामस्थांनी केला आहे.