…या कामासाठी शिपाई व सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का !
देवगड,दि.२५ जानेवारी (गणेश आचरेकर)
मंगळवारपासून सुरू झालेल्या मराठा सर्वेक्षणासाठी नगरपंचायती मधील सफाई कामगारांचा शिपाई यांना कामाला लावले आहे. सफाई कर्मचारी आणि शिपाई कामगारांची या कामासाठी नियुक्ती होताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे त्यामुळे सर्वेक्षणातील 150 हून अधिक प्रश्नांची उत्तरे आणि माहिती मिळवताना त्यांच्या नाकीनव येणार यात काही शंका नाही परंतु कमी शिक्षण झालेल्या कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षणा दरम्यान एखादी चूक झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या सर्वेक्षणासाठी तहसील विभागामार्फत नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. मात्र नगरपंचायतीची मधील ज्या शिपाई व सफाई कर्मचाऱ्यांना हे काम दिले आहे त्यांचे मुळातच शिक्षण कमी असल्यामुळे सर्वेक्षणाची योग्य व अचूक माहिती कसे गोळा करतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.