आचरा महाविद्यालयाचे २७ रोजी स्नेहसंमेलन

आचरा,दि.२६ जानेवारी
आचरा येथील धी आचरा पीपल्स असोशिएशन मुंबई संचलित, मॅनेजमेंट स्टडी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे ‘ स्पंदन २०२४ ‘ हे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार २७ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता संस्थेच्या सभागृहात होणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मिराशी हे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत. तर संस्थेचे महाविद्यालय समितीचे अध्यक्ष संजय मिराशी, शालेय समिती अध्यक्षा नीलिमा सावंत, इंग्रजी माध्यम शाळा समिती अध्यक्ष नीलेश सरजोशी, प्राचार्य जी. टी. दळवी, मुख्याध्यापक जी. बी. परब, इंग्रजी माध्यामच्या मुख्याध्यापिका एम. एस. फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष प्रदीप परब – मिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.