महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे,आघाडी तुटली हे जाहीर करण्याचे बाकी….

भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे याना २३ जागा सुद्धा मिळत नाहीत

 कणकवली दि.२६ जानेवारी(भगवान लोके)
काल रात्री महाविकास आघाडी अधिकृतपणे तुटली आहे. इंडी आघाडीचा पोपट मेलेला आहे. उद्धव ठाकरे याना २३ जागा सुद्धा मिळत नाहीत. तर प्रकाश आंबेडकर यांना दोन पेक्षा जास्त जागा देत नाहीत. बिहार आणि पश्चिम बंगाल सारखेच अवस्था महाराष्ट्राच्या इंडि आघाडीत झाली आहे.काल रात्री कपडे फाडेपर्यंत वाद झाले. आता फक्त महाविकास आघाडी तुटली हे जाहिरात करणे बाकी राहिले आहे.असा गौप्यस्फोट भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी केला.
ममता बॅनर्जी नी राहुल गांधीची न्याय यात्रा आपल्या भागात यायला देणार नाही असं जाहीर केलं आहे.हे स्वतःच घर एकसंघ ठेवू शकत नाहीत. आणि मोदीजी ना हरवायला चालले आहेत.अशी टीका केली नाना पटोले व संजय राऊत आणि अन्य एका नेत्याच पत्र प्रकाश आंबेडकर यांनी फाडून केराच्या टोपलीत टाकलं आहे. नाना पटोले व संजय राऊत हे किती चिल्लर नेते आहेत. ह्यांची किती लायकी आहे. हे त्यांनी दाखऊन दिलं.
विश्वात सर्वात ताकदीचे नेते म्हणून ओळख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस च्या काळा पेक्षा देश मजबूत झाला आहे. हे यश संजय राऊत ला सहन होत नाही.त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाही धोक्यात असल्याची टेप संजय राजाराम राऊत वाजवत आहे.
लोकशाही आणि संविधान धोक्यात कसं असत हे राऊत ने पाकिस्तान व चीन मध्ये जाऊन पाहावं किंवा राहुल गांधींच्या मांडीवर बसून त्याच्या आजीचे किस्से ऐकावेत.राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लादलेली तेव्हा संविधान आणि लोकशाही धोक्यात होती.तेव्हा ना नाईट लाईफ ना,पत्रकार परिषद आता प्रमाणे तुम्ही टीका करता असे काहीच बोलण्याची मुभा नव्हती. उलट मोदी सरकार मध्ये सर्वत्र आज देशात लोकशाही आहे म्हणून तुम्ही आपली मते आणि टीका सरकार वर करत आहात.मोदी सरकारच्या दहा वर्षांत उद्धव ठाकरे सहा वर्षे युती मध्ये होते. मांडीला मांडी लावून बसले होते. तेव्हा संविधान धोक्यात नाय होत का? संजय राऊत सारख्या देश विरोधी व्यक्तीला अटक केली पाहिजे.राज्याच्या मुख्यमंत्री बाबत अशी भाषा करण्यापूर्वी आशा कारट्याला उपटने म्हणजे काय हे बघायला पाठवलं पाहिजे.
राम मंदिर बनण्याच्या अगोदर पासून दंगली घडतील अस वक्तव्य ठाकरे व राऊत करत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली.
पाटणकर यांनी मणी लॉन्ड्रीग केली होती का? आदित्य ठाकरेने दिशा व सुशांतसिंग चा मर्डर केला होता का? या बद्धल उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे असा सवालही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केला.