आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला अटक करा…

शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी ;पोलीस भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आमदार वैभव नाईक यांचा आरोप

कणकवली दि.२६ जानेवारी(भगवान लोके)

आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला”राणे भाजप” चा कार्यकर्ता असल्यामुळेच अटकेची कारवाई टाळली आहे का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा नेत्यांच्या फोटो सहित बॅनर घेऊन ठाकरे शिवसेना घोषणा देत पोलीस स्टेशनवर धडक दिली.कलमठ मधील एका भाजपा कार्यकर्त्यांने आक्षेपार्ह पोस्ट करून देखील त्याच्यावर कारवाई न करता त्याला पाठीशी घालण्याचे काम कणकवली
पोलिसांनी केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्टेशनवर धडक दिली. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला अटक करा,अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, उपशहर प्रमुख वैभव मालडकर, अनुप वारंग, धीरज मेस्त्री, रिमेश चव्हाण, कलमठ ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, सिकंदर मेस्त्री, स्वप्निल शिंदे, शरद साळवी, बोर्डवे शाखाप्रमुख महादेव राठवड, नरेश येंडे, विभाग प्रमुख सिद्धेश राणे, राजू राठोड, सचिन पोळ, विलास गुडेकर, राजू रावराणे आदि उपस्थित होते.

कणकवली पोलिसांवर संबंधित संशयित आरोपी हाभाजपचा कार्यकर्ता असल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला.कणकवली पोलीस राजकीय दबावाखाली काम करत असून ज्या रिक्षा व्यावसायिक असलेल्या भाजपाकार्यकर्त्यांने आक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याच्या विरोधात कणकवली पटवर्धन चौकात देखील भाजपाच कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र तो आपला कार्यकर्ता असल्याचे समजतात पोलिसांवर दबाव टाकून त्याला पाठीशी घातले गेले. त्यामुळे या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आली. मात्र यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी कलमठ मधील सलमान शेख यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसऱ्या संशयित आरोपीला नोटीस देण्यात आली आहे. तर सलमान शेख हा अद्याप सापडलेला नसल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

पोलीस स्टेशनला भाजपाच्या शिष्टमंडळासह हजर होता. मग या संशयित आरोपीला घेऊन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते येत असतील तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर याबाबत मी जबाबदारीने सांगतो तुम्ही सीसीटीव्ही चेक करा,असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले. त्यावर श्री पाटील यांनी संशयित आरोपी आला असेल मग याची तपासणी केली जाईल असे सांगितले. यावेळी पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती करत सलमान शेख या संशयीताला केव्हा अटक करणार?त्याची माहिती द्या अशी मागणी करण्यात आली. त्यावर पोलिसांनी त्याचा शोध सुरू असून त्याच्यावर देखील पोलीस कारवाई करणार आहेत.याबाबत संतोष पुजारे यांनी फिर्याद दिली असल्याची माहिती देण्यात आली.