मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा

कुडाळ, दि.२६ जानेवारी

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शासनामार्फत गावोगावी सर्वेक्षण सुरू असून गुरुवारी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालयात भेट देऊन त्याबाबत प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे व तहसीलदार अमोल पाठक यांच्याकडून आढावा घेतला. तसेच वाडोस गावात सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी भेट देत अधिकाऱ्यांकडून सर्व्हेक्षणाची माहिती घेतली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी जि.प. सदस्य राजू कविटकर,अतुल बंगे, नगरसेवक उदय मांजरेकर,संतोष शिरसाट, श्रेया परब,मथुरा राऊळ, सचिन गावडे, स्वप्नील शिंदे,सागर भोगटे,अमित राणे,निलेश सावंत आदी उपस्थित होते.