पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी,दि.२६ जानेवारी
जिल्हा वार्षिक योजना- अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत सन 2023-24 साठी सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील विविध गावांत जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचविणार आहे. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती असणाऱ्या घडी पुस्तिका आणि पॅम्पलेटचे प्रकाशन देखील पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलिस कवायत मैदानात आज हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पीएम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. मोबाईल व्हॅनव्दारे जिल्ह्यात होणाऱ्या जनजागृती व योजनांविषयी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या उपक्रमाविषयी पालकमंत्री श्री चव्हाण यांनी समाधान व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.