देवगड शहरात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा!

तहसील कार्यालय येथे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण….

देवगड,दि.२६ जानेवारी (दयानंद मांगले)
भारतीय प्रजासत्ताक दिन देवगड तहसीलदार कार्यालय,देवगड पंचायत समिती ,देवगड जामसंडे नगरपंचायत ,देवगड पोलीस स्थानक ,देवगड रापम आगार येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
देवगड तहसीलदार कार्यालय येथे शासकीय कार्यक्रम तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रमेश पवार यांनी ध्वजारोहण केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी सलामी दिली. याप्रसंगी माजी अँड अजित गोगटे,गटविकास अधिकारी श्रीमती वृक्षाली यादव,देवगड पोलीस स्थानक सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव,नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,निवासी नायब तहसीलदार विवेक शेट बीएसएनएल उपविभागीय कैलास पायमोडे, कृषी अधिकारीं कैलास ढेपे,व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते .या सोहळ्याचे निमित्ताने देशभक्त पर गीते,देवगड इंग्लिश मिडीयम स्कुल रंगीत कवायत ,गुणवंत विद्यार्थी सत्कार ,स्थानिक कलाप्रेमी समूहाने कराओके संगीताच्या तालावर देशभक्तीपर गीते सादर केली.
देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव,यांच्या हस्ते ध्वजारोहण ,देवगड पोलीस स्थानकात सहा. पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण देवगड आगारात आगार व्यवस्थापक निलेश लाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या सोहळ्यास प्रमुख अतिथी दयानंद मांगले उपस्थित होते.देवगड आगार येथे श्री सत्यनारायण महापूजा व डबल बारी भजन सामना अयोजित केला होता.