विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष गौरव

इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनाझेशन या संघटनेच्या वतीने

देवगड,दि.२६ जानेवारी
इंटरनॅशनल ह्युमन राईट्स ऑर्गनाझेशन या संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विशेष गौरव सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.यात पत्रकारितेत विविध राज्य जिल्हा स्तर पुरस्कार प्राप्त मीडिया अध्यक्ष दयानंद मांगले ,पोलीस संरक्षण कायदा समिती प्रमुख सेवानिवृत्त सहा. पोलीस निरीक्षक विजय कदम,जिल्हास्तर राज्यस्तर पदक,तसेच आयबीबीएफ शरीर सौष्ठ स्पर्धेत निवड झालेले स्पर्धक,फिटनेस क्लब चे प्रमुख ५४ वेळा रक्तदान ,आणि शेकडो सर्पाना नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडणारे सर्पमित्र संघटचे जिल्हा समनवयक सुरेश कदम यांचा सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन अध्यक्ष दयानंद तेली यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या वेळी महिला अध्यक्ष दीक्षा तेली,सदस्य रविकांत चांदोस्कर उपस्थित होते.या निमित्ताने देवगड पंचायत समिती नूतन गटविकास अधिकारी श्रीमती वृक्षाली यादव यांची भेट घेऊन त्यांना पुढील प्रशासकीय सेवेस शुभेच्छा देण्यात आल्या .या वेळी संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.