देवगडचे नूतन पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी पदभार स्वीकारला…

देवगड,दि.२७ जानेवारी

देवगड पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून भरत गोविंद धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला असून यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक भरत गोविंद धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक भरत धुमाळ हे कोल्हापूर येथील असून त्यांनी या पूर्वी राजापूर पोलीस स्थानकात यशस्वी सेवा बजावली आहे पोलीस सेवेत त्यांनी आतापर्यंत ३२ वर्षे सेवा केली.