विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने “सर्व धर्म समभाव” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

देवगड,दि.२७ जानेवारी

विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाईचारा व सामाजिक बांधिलकी व जातीय सलोखा अबाधित राहावा.तसेच येथील नागरी सलोख्याने वागावेत या प्रामाणिक हेतूने “हम सब एक है” या उक्तीस अनुसरुन विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या संकल्पनेतून व विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दि २६ जानेवारी रोजी ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर “सर्व धर्म समभाव” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करुन सामाजिक एकोपाचा संदेश यावेळी देण्यात आला.दरम्यान सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट तसेच स्टेट्स कोणीही फॉरवर्ड करु नये,तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये.याबाबतही विजयदुर्ग मध्ये जनजागृती करण्यात आली.

या “सर्व धर्म समभाव” क्रिकेट स्पर्धेत विजयदुर्ग मध्ये सर्व धर्मातील लोकांनी तसेच युवकांनी एकत्र येऊन “हम सब एक है” असल्याचा नारा यावेळी दिला.व आपली एकजूट कायम राहिल असेही यावेळी सांगितले.