वेशभूषा स्पर्धेत अनन्या नंदगिरीकर व मनस्वी पालकर प्रथम

वेंगुर्ला,दि.२७ जानेवारी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला येथील सरस्वती शिशुवाटीकेतील लहान मुलांसाठी घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत अनन्या नंदगिरीकर व मनस्वी पालकर यांनी प्रथम, हर्ष देऊलकर याने द्वितीय तर नियान तेली याने तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार तसेच स्पर्धेचे परिक्षक प्रथमेश गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी सरस्वती शिशुवाटीकेच्या संचालिका दिप्ती मांजरेकर-उडीयार व पालक उपस्थित होते. या स्पर्धेनंतर मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले. विजेत्यांना शिशुवाटीकेच्या वार्षिक स्नेहसंमेलनावेळी गौरविण्यात येणार आहे.