चेन्नईतून तो मुस्लिम युवक सुखरूप परतला घरी

आमदार नितेश राणे यांची यशस्वी मध्यस्थी;आ. नितेश राणे यांचे कोळपेतील लांजेकर कुटुंबाने मानले आभार

कणकवली दि.२७ जानेवारी (भगवान लोके)

चुकीच्या पद्धतीने झालेल्या कारवाईत चेन्नई येथे अटक असलेल्या अल्ताफ रमजान लांजेकर वय २५ रा . कोळपे या मुस्लिम युवकाची आमदार नितेश राणे यांच्या यशस्वी मध्यस्थीने सुटका झाली आहे. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुस्लिम समाज व लांजेकर कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.
नार्को टेस्ट प्रकरणात चेन्नई येथे चुकीच्या पद्धतीने अल्ताफ रमजान लांजेकर याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गेले महिनाभर तो चेन्नई जेलमध्ये अटक होता. अल्ताफ रमजान लांजेकर वय २५ रा. कोळपे जमातवाडी येथील मुस्लिम समाजातील युवक आहे.
अल्ताफ गेले दोन वर्ष मुंबई येथील मेडिकल मध्ये कामाला होता. मेडिकल मध्ये काम करत असताना एका प्रकरणात चेन्नई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याची कोणतीही चुक नसताना त्याच्यावर कारवाई झाली होती. तो गेले महिनाभर चेन्नई येथील तुरुंगात अटक होता. याबाबत अल्ताफच्या कुटुंबीयांनी आमदार नितेश राणे यांनी यांची भेट घेत झालेली चुकीची कारवाई निदर्शनाला आणून दिली. आमदार नितेश राणे यांनी चेन्नईचे भाजपा प्रदेशाध्यक्ष अण्णा केनई यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. संबंधित युवकावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाल्याचे लक्षात आणून दिले. त्यांनी चेन्नई पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याची मुक्तता झाली आहे. अल्ताफ लांजेकर हा आता चेन्नई वरून आपल्या कोळपेतील मुळगावी आला आहे.
विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांची लांजेकर कुटुंबीयांनी कोळपे येथे भेट घेतली. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, भाजपा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, गगनबावडा माजी सभापती बंकट थोडगे, हमीद लांजेकर, हमिद नाचरे, शहाबुद्दीन लांजेकर, समीर चोचे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.