मिहिर कुलकर्णी याचे सीए परिक्षेत यश

वेंगुर्ला,दि.२७ जानेवारी

वेंगुर्ला येथील ‘गुरूकृपा‘ कापड दुकानाचे मालक प्रदिप शिवराम कुलकर्णी यांचा मुलगा मिहिर प्रदिप कुलकर्णी याने पुणे येथे सी.ए.फायनल परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याच्या या यशात त्याला आई-वडिलांची मोलाची साथ लाभली. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.