वेंगुर्ला येथून आंबा पेट्या वाशी मार्केटला रवाना

वेंगुर्ला,दि.२७ जानेवारी

लता गुड्स ट्रान्सपोर्टमधून वेंगुर्ला-वडखोल येथील आंबा बागायतदार शिवप्रसाद केरकर यांच्या बागेतील सहा डझनी आंबा पेट्या २६ जानेवारी रोजी वाशी मार्केट मध्ये रवाना झाल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड कुणकेश्वर येथून आंबा पेटी रवाना झाल्यानंतर आता वेंगुर्ला येथून श्री लता गुडस ट्रान्सपोर्ट (भटवाडी) मधून आंबापेटी वाशी मार्केटकरीता रवाना झाली. यावेळी श्री लता गुडस ट्रान्सपोर्टचे मालक व माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत, प्रितम सावंत, नवनाथ सावंत, राजवीर सावंत तसेच आंबा बागायतदार शिवप्रसाद केरकर उपस्थित होते.

फोटोओळी – श्री लता गुड्स ट्रान्सपोर्ट मधून या हंगामातील पहिल्या आंबा पेट्या वाशी मार्केटकरीता रवाना करण्यात आल्या.