रामघाट मंडळाचा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव

वेंगुर्ला,दि.२७ जानेवारी

रामघाट कला क्रीडा मंडळाचा वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २७ ते ३१ जानेवारी या कालावधीत रामघाट रोड नजिकच्या भव्य पटांगणावर आयोजित केला आहे.

२७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता रामघाटवाडी मर्यादित फनिगेम्स स्पर्धा, महिला पाककला स्पर्धा, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक बक्षिस वितरण समारंभ, २९ जानेवारी सायंकाळी ७ वाजता कै. सुधिर कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘व्यंकटेश पद्मावती‘ हा ट्रिकसिन युक्त नाट्यप्रयोग होणार आहे. ३१ जानेवारी ९ वाजता वेंगुर्ला जीवनदायी विकास संस्थेचे जयवंत दळवी लिखित व रमेश नार्वेकर दिग्दर्शित ‘कालचक्र‘ हे दोन अंकी हृदयस्पर्शी नाटक होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन रामघाट कला क्रीडा मंडळातर्फे करण्यात आले आहे.