वेंगुर्ला,दि.२७ जानेवारी
विद्यार्थी वर्गात मतदार म्हणून जनजागृती व्हावी आणि विद्यार्थ्यांना मतदानाच्या कर्तव्याची जाणिव व्हावी, लोकशाहीच्या निरपेक्ष वाढीसाठी मतदान करणे किती अत्यावश्यक आहे याची जाणिव जागृती व्हावी यासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालातील राज्यशास्त्र विभागाच्यावतीने विद्यार्थी वर्गास शपथ देऊन मतदार दिवस साजरा करण्यात आला.
प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी विद्यार्थ्यांनी मतदार दूत म्हणून समाजात जनजागृती करावी असे आवाहन केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख पा. वामन गावडे यांनी मतदानाच्या पवित्र हक्काबाबत युवा मतदारांना मार्गदर्शन करीत सविधांनाच्या विविध मूल्याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.नंदगिरीकर यांनी विद्यार्थ्यांना मतदान विषयी शपथ दिली. यावेळी प्रा.एम.आर.नवत्रे, डॉ.बी.जी. गायकवाड, प्रा.जी.पी.धुरी, डॉ.पी.आर.गावडे, प्रा.नैताम, डॉ.के.आर.कांबळे, डॉ.सचिन परुळकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.