पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती व चित्रकला प्रदर्शन काझिशहाबुद्दीन हॉल एसटी . स्टॅण्ड समोर ०३ फेब्रुवारी

सावंतवाडी दि.२७ जानेवारी 
सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघ व देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती व चित्रकला प्रदर्शन काझिशहाबुद्दीन हॉल एसटी . स्टॅण्ड समोर शनिवार दि.०३ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी चित्रकला विषयक करीअर मार्गदर्शन ११ वाजता, व्यक्तिचित्र प्रात्यक्षिक १२. वाजता,स्थिरचित्र प्रात्यक्षिक ३ वाजता होणार आहे.गणेश मूर्ती अगरचित्र किंवा शो पीस शुक्रवार दि २ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ नंतर आणून द्यावयाच्या आहेत. तसेच ४ फेब्रुवारी ला ५. वा. न्यावयाची जबाबदार संबंधिताची आहे. गणेशमूती २ फुटापर्यत असावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी गणेश मूती करणे स्पर्धा सकाळी १० ते २ वाजता होणार आहे.तत्पूर्वी नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी सकाळी ९.पासून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी बक्षिसे
पहिल्या गटासाठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.या आयोजित कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष बापू सावंत,उदय अळवणी यांनी केले आहे.