आचरा, दि.२७ जानेवारी (अर्जुन बापर्डेकर)
स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांचा श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत आचरा वरचीवाडी येथील सुनील खरात यांच्या घरी आयोजित करण्यात आला आहे यासाठी सकाळी दहा वाजता आचरा तिठा येथून पालखी पादुका परिक्रमा मिरवणूक निघणार आहे.वरचीवाडी आदर्श नगर येथील सुनील खरात यांचे निवासस्थानी पालखीचे आगमन पालखी पादुका दर्शन सोहळा दुपारी एक वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजता महारथी तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ महाराज उत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे