देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत देवश्री संगीत विद्यालय आचरा, न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रथम

आचरा, दि.२७ जानेवारी (अर्जुन बापर्डेकर)
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा तर्फे आयोजित जिल्हास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेत खुल्या गटात देवश्री संगीत विद्यालय आचरा ने प्रथम क्रमांक तर शालेय गटात न्यू इंग्लिश स्कूल आचरा ने प्रथम क्रमांक मिळविला.खुल्या गटात उमामिलिंद पवार हायस्कूल देवगड द्वितीय, स्वरांजली गृप हळवल तृतीय तर उत्तेजनार्थ परडेकर मंडळ,स्वरगंध गृप देवूळवाडी, इंग्लिश मेडीअम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, बाळगोपाळ मंडळ वरचीवाडी, बीएएमएस कॉलेज यांना गौरविण्यात आले. तर शालेय गटात इंग्लिश मैडिअम स्कूल आचरा द्वितीय, बागजामडूल शाळा तृतीय तर उत्तेजनार्थ केद्र शाळा आचरा ,डोंगरे वाडी शाळा यांना गौरविण्यात आले.
वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्था आचरा, श्रीकांत सांबारी यांच्या स्मरणार्थ श्रीमती वैशाली सांबारी व कै सदाशिव कृष्णाजी व शारदा स.जोशी यांच्या स्मरणार्थ अभिजित जोशी यांनी पुरस्कृत कैली होती.स्पर्धेचे उद्घाटन आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते दिप प्रज्वलनानै झाले. यावेळी त्यांच्या सोबत संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, पतसंस्था चेअरमन मंदार सांबारी,उपसरपंच संतोष मिराशी, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, जयप्रकाश परुळेकर, श्रीमती वैशाली सांबारी,दिपाली कावले, भिकाजी कदम,विरेंद्र पुजारै,पतसंस्थेचे दौलत राणे, अभिजित जोशी, देवस्थान ट्रस्टी रविंद्र गुरव,परीक्षक आस्था आचरेकर, डाँ सिद्धेश सकपाळ,ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समितीचे भावना मुणगेकर, श्रद्धा महाजनी, कामिनी ढैकणे ,रुपेश साटम,विलास आचरेकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी महेश बापर्डेकर, समृद्धी बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण, महेश मैस्री यांनी विशेष परीश्रम घेतले.