कणकवली दि.२७ जानेवारी(भगवान लोके)
कणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
यापूर्वी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केले होते. रत्नागिरी ग्रामीण भागातील बऱ्याच गुन्ह्यांचा उलगडा त्यांनी केला होता. तसेच अवैध धंद्यांवर देखील कारवाई केली होती.
कणकवली तालुक्यात होणाऱ्या होणारे गुन्हे रोखून झालेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास,अवैध धंदे यावर नियंत्रण आणण्याचे नवीन पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या समोर आव्हान आसणार आहे.