कातवनेश्वर येथील कार सेवक विष्णू पेडणेकर यांचा भंडारी समाजाच्या वतीने सत्कार

देवगड,दि.२७ जानेवारी
श्रीराम जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी दिनांक २२जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मूर्ती स्थापना करण्यात आली हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनातला सुवर्ण क्षण होय, परंतु त्यासाठी जो संघर्ष करावा लागला त्या कार सेवकांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला त्यामध्ये कुणकेश्वर कातवणेश्वरचे विष्णू शंकर पेडणेकर यांचा भंडारी समाज जिल्हा कार्यकारी सदस्य यांच्या वतीने सत्कार देवगड येथे करण्यात आला.
यावेळी हेमंत करंगुटकर , आप्पा मांजरेकर,प्रदीप मुणगेकर, दरीत अनंत परुळेकर, संतोष भुजे, सुरेज आचरेकर, पंढरी आचरेकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.