सावंतवाडी राजवाड्याच्या गेटवर मराठा समाज बांधवांचा आज आनंद उत्सव साजरा

सावंतवाडी दि.२७ जानेवारी
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळाले आणि त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या त्यामुळे सावंतवाडी राजवाड्याच्या गेटवर मराठा समाज बांधवांनी आज आनंद उत्सव साजरा केला.
आपल्या मराठा कुणबी बांधवांना प्रमाणपत्र आणि ओबीसी सवलती देण्याचे जाहीर केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते विकास सावंत, सिताराम गावडे, अभिषेक सावंत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले मनोज जहांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळाले त्याबद्दल समाधान आहे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेल त्यावेळी खरा विजय होईल असे त्यांनी सांगितले. न्यायालयामधील प्रतीक्षेत असणारी याचिका आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुचवलेल्या काही नवीन नियमांच्या आणि गॅजेटच्या आधारावर सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते विकास सावंत, युवराज लखनराजे भोसले, सिताराम गावडे,सौ अर्चना घारे ,अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी, दिगंबर नाईक, विशाल सावंत ,उमाकांत वारंग, अभिजीत सावंत, विलास जाधव, मनोज घाटकर ,सी एल नाईक,सूर्यकांत राऊत, संजय लाड, अजित सावंत, पूजा दळवी, आरती मोरे, बाबू कुडतरकर तसेच मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोज पाटलांच्या विजयाच्या घोषणा आणि फटकांची आतषबाजी देखील करण्यात आली.