राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना विविध विषय घेण्याची संधी देणारे – डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू

सावंतवाडी दि.२७ जानेवारी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मुंबई विद्यापिठ स्वायत्त महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर केली गेली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी मुंबई विद्यापीठातील सर्वच म्हणजे स्वायत्त नसलेल्या जवळजवळ ८१२ महाविद्यालयांमध्ये केली जाणार आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन प्राचार्यांसाठी कार्यशाळा पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये घेण्यात आली होती .या कार्यशाळेमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी व
प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ शुभदादेवी भोंसले यांच्या शुभहस्तेे करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमसावंत भोंसले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी ,प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे , विविध विभागांचे अधिष्ठाता डॉ. अनिल सिंग, डॉ. सुनील पाटील ,डॉ. माधव राजवाडे, डॉ.किशोरी भगत,सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियमक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत,संचालक प्रा. डी.टी देसाई, सहाय्यक संचालक अॅड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी एल भारमल,सिंधूदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल. भारमल यांनी केले.
मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी याप्रसंगी राष्र्टीय शैक्षणिक धोरण याबद्दल माहीती दिली. या शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्याला विषय निवडीची लवचिकता मिळालेली आहे असे ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी याप्रसंगी प्राचार्याना मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या नवीन शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या ८१२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे.हे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचे विषय निवडण्याचे दालन खुलं करणार आहे.त्याला आवडणारा विषय तो कोणत्याही महाविद्यालयात असेल तो विषय तो घेऊ शकतो ,तेथे मिळालेली क्रेडिट त्याच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. त्या विद्यार्थ्याने एक वर्ष पूर्ण केल्यास सर्टिफिकेट कोर्स, दोन वर्षे पूर्ण केल्यास डिप्लोमा, तर तीन वर्षे पूर्ण केल्यास डिग्री सर्टिफिकेट प्रदान करण्यात येणार आहे. पदवी परीक्षेमध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्याला रिसर्चमध्ये जाण्याची संधी प्राप्तत होणार आहे.हे शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्री असून विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला प्रेरक ठरणारे आहे.या शैक्षणिक धोरणामुळे भारतातील विद्यार्थी हा परदेशी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये योग्य रीतीने आपले करिअर करू शकणार आहे .मुंबई विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयात या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सर्वच महाविद्यालयांमध्ये होणार असल्याने मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व विभागातील क्लस्टर कॉलेज, लीड कॉलेजेस मध्येे जाऊन ते या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बद्दल प्राचार्यांशी संपर्क अभियान त्यांनी चालू केले आहे.तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांशी सुसंवाद साधून त्यांनाही त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल माहिती दिली.या दोन सत्रात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य उपस्थित राहिले होतेयामध्ये , डॉ. एस ए ठाकूर, मालवण,प्राचार्य डॉ. काकडे ,वैभववाडी, डॉ. लोखंडे, कुडाळ , डॉ. राजेंद्र मुंबईकर, कणकवली, डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. शामराव दिसले, डॉ. विजयकुमार कुनुरे, देवगड, डाॅ.संभाजी शिंदे पणदुर, डॉ. गोविंद काजरेकर, बांदा, डॉ. एस व्ही मोरे, डॉ. एम बी चौगुले, वेंगुर्ला, प्रा. मिलिंद गोळसे ,दोडामार्ग आदी प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. सौ. पीजी नाईक यांनी केले तर आभार डॉ. एस एम बुवा यांनी मानले.