जामसंडे गणेशनगर येथील रहिवाशी सुगंधा ठाकूर यांचे निधन

देवगड,दि.२७ जानेवारी
जामसंडे गणेशनगर येथील रहिवाशी सुगंधा यशवंत ठाकूर यांचे कुडाळ येथे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांचे वय ८३ वर्ष होते. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. देवगड पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक उमेश ठाकूर आणि कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्रा. रवींद्र ठाकूर यांच्या त्या आई होत. तसेच देवगड येथील माजी नगरसेविका हर्षा ठाकूर यांच्या त्या सासूबाई होत.