सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची भेट घेऊन यशस्वी तोडगा काढला

सावंतवाडी, दि.२७ जानेवारी
इन्सुली कोठावळे बांध येथील ग्रामस्थ
गौण खनिज खाणींमुळे होत असलेल्या नुकसानी बाबत प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करुनही दखल घेत नसल्याने काल प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण छेडले रात्रो पर्यंत उपोषणावर तोडगा न निघाल्याने सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी रात्री प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांची भेट घेऊन यशस्वी तोडगा काढत प्रांताधिकारी यांच्याकडून लेखी पत्र देत उपोषण मिटवले.

इन्सुली कोठावळे बांध येथील अजय कोठावळे, सरपंच तात्या वेंगुर्लेकर सह त्या वाडीतील रहिवासी इन्सुली, वेत्ये, निगुडे, सोनुर्ली येथे मोठ्या प्रमाणात गौण खनिज काळ्या दगडाचे उत्खनन उच्च क्षमतेचे बोअर केले जात होते, रात्री उशिरापर्यंत बाल्टीस्टींग केले जात असल्याने घरांचे नुकसान, धुळीचे साम्राज्य मुळे बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याबाबत प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने इन्सुली कोठावळे बांध येथील ग्रामस्थांनी उपोषण छेडले.

संध्याकाळी सात वाजेपर्यंत इन्सुली ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नसल्याची माहिती सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांना मिळताच उपोषण कर्ते यांच्याशी चर्चा करून, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढत प्रांताधिकारी यांच्या हस्ते कारवाई पत्र देत उपोषण स्थगित केले.