सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित पुरुष व महिला भव्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा जामसंडे येथे २८ जानेवारी रोजी आयोजित

देवगड,दि.२७ जानेवारी
वायंगणकर्स फिटनेस जामसंडे, कोकण सिंधू पावर लिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित पुरुष व महिला भव्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२४ रोजी श्री मो .ज .गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी स.९. वा.आयोजित करण्यात आली आहे .
या स्पर्धेत सब ज्युनिअर ,जूनियर सीनियर व मास्टर या वयोगटातील पुरुष व महिला वजनी गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित स्पर्धा होणार आहेत. तरी या स्पर्धेकरिता उपस्थित रहावे असे आवाहन वां वायंगणकर्स व्यायाम शाळा यांनी केले आहे.