कणकवलीत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना कार्यकारिणीची बैठक

शिवसेना पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आवाहन

कणकवली दि .२७ जानेवारी(भगवान लोके)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना कार्यकारिणीची बैठक उद्या रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता कणकवली विजयभवन येथे आयोजित करण्यात आली आहे.त्यानंतर सायं ५ वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

या बैठकीला खासदार विनायक राऊत, उपनेते अरुणभाई दुधवडकर, आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत,प्रदीप बोरकर,कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, उपनेत्या जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव हे उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख व इतर प्रमुख प्रदाधिकारी यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.