अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक…

वागदे, साकेडी फाटा येथे केला अत्याचार ; संशयित आरोपी हा मूळ देवगडचा

कणकवली दि.२७ जानेवारी(भगवान लोके)

वागदे येथील नातेवाईकाकडे राहणारा संशयित आरोपी तुषार सत्यवान परभू (वय -२३,मुळ रा. मुटाट, गयाळवाडी,ता. देवगड) याने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वागदे, साकेडी फाटा या ठिकाणी अत्याचार घटना उघडकीस आली आहे.संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित अल्पवयीन तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी तुषार सत्यवान परभू यांची अल्पवयीन युवतीची सोशल मीडियावर ओळख झाली.त्यानंतर त्यांची मैत्री झाली,त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते.मात्र ,त्याचा आरोपीने गैर फायदा घेत १४ नोव्हेंबर २०२३ ते १२ डिसेंबर २०२३ या कालावधीत युवतीवर सातत्याने लैंगिक अत्याचार केला.या प्रकरणी कणकवली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३७६, ३७६ (३), ३७६(२ जे),३७६ (२ एन) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.