आचरा पोलीस स्टेशन निरीक्षक पदी सुरेश गावित

आचरा,दि.२७ जानेवारी(अर्जुन बापर्डेकर)
आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार रत्नागिरी संगमेश्वर येथे सेवा बजावलेले सुरेश ठाकूर गावित यांनी शनिवारी स्विकारला. यामुळे आचरा पोलीस स्टेशनला निरिक्षक दर्जाचाअधिकारी मिळाला आहे.
या अगोदर पोलीस निरीक्षक गावित यांनी रत्नागिरी जिल्ह्यात साडेचार वर्षे सेवा बजावली आहे. यात पुर्णगड पोलीस स्टेशन, पावस बाणकोट,संगमेश्वर या पोलीस ठाण्यांत सेवा बजावली आहे