देवगड,दि.२८ जानेवारी
श्री. स. ह.केळकर महाविद्यालय देवगड,येथील Department of B.Voc. (Hospitality and tourism ) यांनी 25th जानेवारी ला ‘राष्ट्रीय पर्यटन दिन ‘ निमित्ताने कोळोशी येथील प्रागैतिहासिक दगडी लेणीला भेट दिली.विद्यार्थ्यांना नवीन अनोळख्या ठिकाणची माहिती मिळावी हा यामागील हेतू होता.अलीकडच्या काळात इतिहास संशोधकांना या लेणीमध्ये सूक्ष्म हत्यारांचा शोध लागला आहे. त्यावर त्यांचे संशोधन चालू आहे. या दगडी लेणीपर्यंत पोहोचायला देवगड निपाणी महामार्गापासून जंगलात किमान एक तास चालत जावे लागते.तसेच फोटोग्राफीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
याप्रसंगी b.voc विभागाचे प्रमुख प्रा. अमोल तेली, प्रा. सोपान गोरे, प्रा. दीप्ती कांबळे आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.