भाकरवाडी युवक क्लब तळवडे आयोजित क्रिकेट स्पर्धेत मंगेश इलेव्हन तळवडे अंतिम विजेता ठरला !

देवगड,दि.२८ जानेवारी
भाकरवाडी युवक क्लब तळवडे यांच्यावतीने २६व्या वर्षी ग्रामपंचायत व नगर पंचायत मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन २५ जानेवारी ते २७ जानेवारी २०२४ आयोजित करण्यात आली होती त्या पहिल्या सेमी फायनल मध्ये प्रथम फलंदाजी करताना मंगेश इलेव्हन संघाने ४७ धावा केल्या त्याचा पाठलाग करताना जयभवानी कट्टा संघ पराभूत झाला तसेच दुसऱ्या सेमी फयनलमध्ये महालक्ष्मी इलयेसडा विरुद्ध शिवशक्ती तिर्लोट याच्यमध्ये महालक्ष्मी इळयेसडा संघाने ४७ धावा केल्या त्याचा यशस्वी पाठलाग करून शिवशक्ती तिर्लोट संघाने सहजरीत्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून तिर्लोट संघाने क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना आकाश मसुरकरच्या २७ धावांच्या जोरावर मंगेश इलेव्हन संघाने सहा षटकांमध्ये ५३ धावा केल्या केतन तिर्लोटकराच्या ३४ धावांच्या जोरावराती तिर्लोट संघाने यशस्वी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तिर्लोट संघाला ५२ धावा पर्यंत मजल मारता आली त्यामुळे मंगेश इलेव्हन तळवडे हा संघ भाकरवाडी युवक क्लब च्या २६ व्या वर्षी महविजेता ठरला स्पर्धेतील उकृष्ट फलंदाज आकाश मसुरकर (तळवडे) उकृष्ट गोलंदाज गणेश तोंडवलकर (तळवडे)यांना गौरवन्यात आले तर स्पर्धेतील मालिकावीर आणि अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून केतन तिर्लोटकर (तिर्लोट) याला गौवरविण्यात आले स्पर्धेच्या बक्षिस वितरण समरंभाला सरपंच गोपाळ रुमडे मंगेश धुरी काका मोंडकर पोलीस पाटील राजेश साटम सौ श्वेता शिवलकर पंचायत समिती स्वचछता विभाग प्रमुख विनायक धुरी तिर्लोट उपसरपंच प्रताप तिर्लोटकर पत्रकार नागेश दुखंडे इत्यादी उपस्थीत होते स्पर्धेतील सामन्यांचे समालोचन इम्रान सा टविलकर दिनेश ठुकरुल ऋत्विक धुरी प्रथमेश माणगावकर यांनी तर स्कोरर म्हणुन अभिजीत मोंडकर गणेश लब्दी विकास धुरी यांनी काम पाहिले तसेच पांच म्हणून स्वप्नील रुमडे मयुरेश मोंडकर मयुर सावंत संजय आचरेकर प्रशांत सावंत यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रसाद दुखंडे सचिव आबा रुमडे अवधूत मोंडकर सुभाष सावंत स्वप्नील रुमडे संजय आचरेकर दीपक अनुभवने सहदेव धुरी प्रशांत दुखंडे प्रशांत सावंत अनिल सावंत व सर्वच सभासदांनी विशेष मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली शिस्तबद्ध नियोजनाबद्दल सर्व मान्यवरांनी मंडळाच्या सदस्यांचे कौतुक केले.