रत्नागिरी -सिंधुदुर्ग मधून एकमेव विद्यार्थ्यांची निवड
फोंडाघाट,दि.२८ जानेवारी(संजय सावंत)
५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या बटालियनचा साहिल संदिप पडवळ या विद्यार्थ्यांची २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या संचलनात एनसीसी विभागामार्फत निवड करण्यात आली होती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या एकमेव विद्यार्थ्यांची निवड झाली होती. कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दिया दयाळ सेना मेडल प्राप्त यांचे तसेच सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांचे मार्गदर्शन लाभले.
हा विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. अनेक फेऱ्या पूर्ण केल्यानंतर दिल्ली येथे होणाऱ्या संचालनासाठी त्याची अंतिम निवड करण्यात आली होती. ही कोकणासाठी, सिंधुदुर्ग जिल्हयासाठी अभिमानास्पद बाब आहे अशी माहिती लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी दिली. या एनसीसी बटालियनमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण साडेतीन हजार मुलांचा सहभाग होता. तसेच ५५ शाळा महाविद्यालयांचा यामध्ये सहभाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आरडीसी कॅम्पसमधून कणकवली कॉलेज चा विदयार्थी साहिल पडवळ याची दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाला झालेल्या संचालनासाठी निवड झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून साहिल याची कोल्हापूर येथील कॅम्पसमध्ये निवड झाली तसेच पुणे येथे परेड घेण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर संचालन केले आहे. साहिल पडवळ हा वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावाचा सुपुत्र आहे.सध्या कणकवली कॉलेज मध्ये बीएससी च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.तसेच तो उत्तम चित्रकार आहे.त्याच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.