कुणकेरी येथे रस्त्या भूमिपूजन महाराष्ट्र बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत

सावंतवाडी,दि.२८ जानेवारी
कुणकेरी गावामध्ये गेली २५ वर्षे रखडलेला कुणकेरी हरिजन वाडी ते माडखोल तलाव रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १ कोटी ६७ लाख रुपये सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयतनांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर करण्यात आला या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत,भाजपा जिल्हा सरचिटणीस व जिल्हा बँक संचालक महेश सारंग,विधानसभा संपर्क प्रमूख संजू परब वेंगुर्ला तालुकाध्यक्ष बाळू देसाई , प्रमोद सावंत, संजना सावंत, प्राजक्ता केळुस्कर,शिवाजी परब, दिनेश सारंग, प्रमोद गावडे, सुनिल परब, संदीप हळदणकर, योगेश गवळी, दिलीप भालेकर, परिक्षीत मांजरेकर,ज्ञानेश्वर परब, रमेश गावडे आदि मोठया प्रमाणात ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते