कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार” जाहीर

सावंतवाडी दि.२८ जानेवारी
नुकताच नारायण सुर्वे वाचनालयाचा भिमराव कोते विशेष काव्य पुरस्कार प्राप्त झालेल्या कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांना त्या पुरस्कारापाठोपाठ त्यांच्या हेतकर्स प्रकाशनने प्रकाशित केलेल्या शिल्लक भितीच्या गर्भकोषातून या कवितासंग्रहाला पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कारही जाहीर झाला आहे.

तिच्या कवितासंग्रहाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्व मान्यवर साहित्यिक आणि विचारवंतांकडुन कौतुक होत आहे.