सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक केशवसुत कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने हॉस्पिटला बेडशीटच वाटप.

सावंतवाडी,दि.२८ जानेवारी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक केशवसुत कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व राणी जानकीबाई साहेब सुतिका गृह या रुग्ण सेवा केंद्रामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रुग्णांसाठी १२० बेडशीटांचं वाटप करण्यात आले.
रुग्णांना याचा लाभ व्हावा याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर एवाळे,डॉ चौगुले,डॉ जाधव, सिस्टर व हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते तर राणी जानकीबाई साहेब सुतिकागृहाचे अधीक्षक डॉ. विकास कटाने डॉ. संजय दळवी ,वरिष्ठ लिपिक भार्गवराम शिरोडकर तसेच सिस्टर व कर्मचारी उपस्थित होते.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर सामाजिक बांधिलकी विषयी बोलताना म्हणाले सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून लोकहित जपणारे असे अनेक उपक्रम शहरात व शहराच्या बाहेर राबवले जातात

हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. एवाळे यांनी सामाजिक बांधिलकीचे तोंड भरून कौतुक केले. सामाजिक बांधिलकीचे असेच सहकार्य पुढे राहू दे सामाजिक बांधिलकीचे उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक यांनी सर्वांच्या आभार मानले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे, शैलेश नाईक ,समीरा खलील, संजय पेडणेकर रवी जाधव ,अशोक पेडणेकर, हेलन निब्रे रूपा मुद्राळे, सुजय सावंत, शरद पेडणेकर, श्याम हळदणकर, शेखर सुभेदार तर जेष्ठ नागरिक केशवसुत कट्टा यांच्या वतीने दत्तप्रसाद गोठस्कर व रोड्रिक्स हे उपस्थित होते.