सावंतवाडी,दि.२८ जानेवारी
हार्मोनियम व ऑर्गनवादक स्व.पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ बुधवार दि.३१ जानेवारी रोजी संगीत सभेचे आयोजन श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे.चंद्रकांत घाटे, मित्रमंडळ सावंतवाडी यांच्यावतीने यंदा सलग १९ व्या आयोजन केले आहे.
श्री. मंगेश मेस्त्री, सावंतवाडी यांचे सोलो हार्मोनियमवादन तसेच गोवा येथील सुप्रसिद्ध गायक श्री.सुभाष परवार (पं.राजा काळे यांचे शिष्य) यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, त्यांना हार्मोनियम साथ श्री. निलेश मेस्त्री, सावंतवाडी, तबला साथ श्री. निरज भोसले, सावंतवाडी व श्री.किशोर सावंत, सावंतवाडी यांची असून सूत्रसंचालन कु.गौरवी घाटे व श्री. संजय कात्रे सर, कणकवली हे करणार आहेत.