कनेडी-तांडा वस्ती पर्यंत जाणाऱ्या रस्त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल

प्रांताधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांचे करण्याचे आश्वासन;आ.नीतेश राणे यांची उपोषण स्थळी भेट..

कणकवली दि .२८ जानेवारी(भगवान लोके)

कणकवली: सांगवे ,कनेडी बाजार ते तांडा वस्तीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले असून रस्ता खुला करावा. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईसाठी तेथील ग्रामस्थांनी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी उपोषण केले. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी याप्रश्नी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन प्रांताधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांचे यांनी दिले.

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत,पंचायत समिती माजी सभापती सुरेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री आदी उपस्थित होते.यावेळी प्रांताधिकारी जगदिश कातकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. त्यानंतर आठवडाभरात आवश्यक बाबी पूर्ण करून रस्ता खुला करण्याची कार्यवाही करा, अशा सूचना आमदार राणे यांनी दिल्या. त्यानुसार घटनास्थळी जाऊन पाहणी करून योग्य कार्यवाहीचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

दरम्यान, संबंधिताने केलेले अनधिकृत बांधकाम वाचवत असाल तर एसीबी चौकशी करावी लागेल, असा इशारा ग्रामसेवकांना आमदार नितेश राणे यांनी दिला. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत पाहणी करतो, असे सांगितले.
तर पूर्वापार सुरू असलेला रस्ता बंद करता येतो का? असा सवाल यावेळी संदेश सावंत यांनी केला. यावेळी श्री. कातकर यांनी शेतीकडे जाणारा रस्ता खुला करता येतो, असे सांगितले. तर या दरम्यान दाखल झालेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबधित रस्ता हा ग्रामपंचायतीच्या मालकीचा नाही,अशी भूमिका घेतली. काही असले तरी या रस्त्याच्या पलिकडच्या लोकांनी जायचे कसे? मला मार्ग काढून द्या. पर्याय कसा काढायचा हे तुम्ही बघा, असे राणे यांनी सांगितले. अतिक्रमण ग्रामपंचायतीने हटवले पाहिजे, अशी प्रांताधिकारी कातकर यांनी सांगितले. पोलिस बंदोबस्त घेऊन प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम तोडावे, अशी भूमिका संदेश सावंत यांनी घेतली.

यावेळी बाबू वाळके, सुरेश सावंत, संजय चव्हाण, किरण चव्हाण, मारुती मोहिते, दिलीप पवार, प्रकाश पवार, शिवाजी पवार, तुकाराम जाधव, जनाईन जाधव, सागर जाधव, सुखदेव जाधव, परशुराम मोहिते, सोमनाथ मोहिते, दादा पवार, संदीप पवार, मयुर पवार, संतोष जाधव, सुरेश जाधव, विष्णू मंडारे, लवू चव्हाण, नीलेश गुरव, अनिल मगदूम, जीतेंद्र चव्हाण, प्रदीप मोहिते, बबन मोहिते, प्रणय केळूसकर, पुष्पा पवार, संगीता पवार, माधवी पवार, नीता जाधव, सुनीता जाधव, सरिता चव्हाण, सरिता पवार, शालिनी मगदूम, उषा जाचव, आरती जाधव, सुवर्णा मोहिते, सवित्री भंडारे, लक्ष्मी जाधव आदि उपस्थित होते.
फोटो ओळ- कणकवली येथे कनेडी येथील ग्रामस्थांच्या उपोषणावेळी प्रांताधिकारी जगदिश कातकर,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यासोबत चर्चा आमदार नीतेश राणे यांनी चर्चा केली.