राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत कबड्डी स्पर्धेचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

विजय कदम मित्र मंडळ, कलंबिस्त व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी खेळाडू संघटनेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन

कणकवली दि .२८ जानेवारी(भगवान लोके)

विजय कदम मित्र मंडळ, कलंबिस्त व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी खेळाडू संघटनेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत कबड्डी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .

विजय कदम मित्र मंडळ, कलंबिस्त व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी खेळाडू संघटनेच्या सहकार्याने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जिल्हास्तरीय कबड्डी स्पेर्धेत जय महाराष्ट्र सावंतवाडी, शिवभवानी सावंतवाडी, जामसांडे पंचक्रोशी,कलेश्वर नेरूर कुडाळ,लक्षुमीनारायण वालावल, यंगस्टार कणकवली, विजय प्रतिष्ठान सावंतवाडी,देवली मालवण,यक्षिणी माणगाव,सिंधुपुत्र कोळोशी,शिरशिंगे,सावरवाड, कोणशी,वाडोस,कलंबिस्त या १५ संघानी सहभाग घेतला आहे.

यावेळी बोलताना अबिद नाईक म्हणाले, कलबिस्त सारख्या ग्रामीण भागामध्ये पंधरा वर्षे सातत्याने कबड्डी स्पर्धा होत आहेत, जर हे सातत्य पुढे टिकवायचा असेल तर याच ठिकाणी एकादे सुसज्ज मैदान या आयोजकांना आणि खेळाडूंना निर्माण करून दिलं पाहिजे. म्हणून गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती सावंत यांना मी विनंती करतो जागा उपलब्ध करून देत प्रस्ताव सादर करावा.आपण तो प्रस्ताव पुढे नेऊन आवश्यक असणारा निधी मंजूर करून सुसज्ज असे मैदान या गावासाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. पक्ष कोणताही असो खेळ कोणताही असो आयोजक कोणीही असो परंतु या खेळाडूंना न्याय द्यायचा असेल तर असे सुसज्ज मैदान या गावात असणे आवश्यक आहे. त्यामुळे या गावाने पुढाकार घ्यावा आपण लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले

यावेळी सरचिटणीस सुरेश गवस ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे,प्रांतिक सदस्य सत्यजित धारणकर,तालुकाध्यक्ष उदय भोसले, सदस्य गुरुदत्त कामत,सरपंच श्रीमती सावंत , उपसरपंच श्री. पास्ते,राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी अमित केतकर, गणेश चौगुले, सचिन अडलकर , संतोष कोकाटे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विजय कदम मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.